बेळगाव येथे मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ सावंतवाडीत धरणे आंदोलन

सावंतवाडी – महाराष्ट्र-कर्नाटक या राज्यांच्या सीमा भागात असलेल्या बेळगाव येथे मराठी भाषिकांना कन्नड भाषिक संघटनांकडून मारहाण करण्यात आली अन् तेथे मराठी भाषिकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, सिंधुदुर्गच्या वतीने १६ मार्चला समितीचे अध्यक्ष वसंत केसरकर यांच्या उपस्थितीत शिवाजी चौकात धरणे आंदोलन चालू करण्यात आले.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरु, इफ्तेकार राजगुरु आदी सहभागी झाले आहेत.