महाराष्ट्रातील घटनांमुळे सर्वसामान्य माणूस निराशेकडे चालला आहे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

“राज्यात कोरोनावरील उपचारांचा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाचा पत्ता नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. प्रत्येक विषयात केंद्रशासनाला दोष द्यायचा असेल, तर राज्य केंद्राकडेच चालवायला द्या.”

नागपूर येथे संचारबंदीला व्यापार्‍यांचा विरोध

जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’च्या अंतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंधांच्या नावावर दुकाने बंद करण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयाला व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केला आहे.

अमरावती महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना अटक

२ कोटी ४९ लाख रुपयांचे शौचालय अपहार प्रकरण. महापालिकेचे माजी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ कोटी ४९ लाख रुपयांच्या शौचालय अपहार प्रकरणी ८ एप्रिल या दिवशी अटक केली.

‘मास्क’ वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा ! – मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकुर

मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. जन्म-मृत्यू तर विधिलिखित आहे. आपण मृत्यूलोकात रहात आहोत. याठिकाणी जन्म-मृत्यू, यश-अपयश सर्वकाही आधीच ठरलेले आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा !

सांगली जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही’, असे फलक लावले आहेत. कोल्हापूर शहरातील ११ पैकी ९ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्‍या !

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरातही रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्‍या पडत आहेत.

सासवड शहरातील पालखीतळावर भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी ! 

प्रशासनाने नियम मोडणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याचे धोरण त्वरित अवलंबावे

विवाह समारंभाला येणार्‍यांनी लसीकरण करणे किंवा कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक !

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही विवाह समारंभासाठी ५० वर्‍हाडींची मर्यादा कायम !

गावोगावच्या ग्रामसुरक्षा समित्या झाल्या निष्क्रीय !

ग्रामसुरक्षा समित्या निष्क्रीय झाल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची ग्रामस्थांची मागणी .

सातारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार ! – प्रदीप विधाते

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे सर्व आरोग्य केंद्रे निरीक्षणाखाली रहाणार आहेत.