‘मास्क’ वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा ! – मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकुर

उषा ठाकुर

भोपाळ (मध्यप्रदेश) – मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. जन्म-मृत्यू तर विधिलिखित आहे. आपण मृत्यूलोकात रहात आहोत. याठिकाणी जन्म-मृत्यू, यश-अपयश सर्वकाही आधीच ठरलेले आहे. त्यामुळे कोरोनाला उगाच घाबरून मास्क वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही, असे विधान मध्यप्रदेश राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री उषा ठाकुर यांनी केले आहे. उषा ठाकुर स्वतःही मास्क वापरत नाहीत. ‘नियमित यज्ञ आणि अग्निहोत्र केल्यास कोरोनापासून बचाव शक्य आहे’, असेही त्या म्हणाल्या.