गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध करून द्याव्यात ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाच्या माध्यमातून मागणी

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौद बांधून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते,..

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करू ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे; परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे कुंभार समाजाची अतोनात हानी होत आहे.

कोरोना महामारी काळात खरेदी केलेल्या साहित्यात ३५ कोटी रुपयांचा घोटाळा

कोरोना महामारीतही भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारात किती आकंठ बुडालेले असतील, याची कल्पना येते. अशांची पाळेमुळे खणून काढून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेच्या उत्पादनांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढा !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेच्या उत्पादनांच्या वेष्टनांवर हनुमानाचे चित्र मुद्रित केलेले आहे. या उत्पादनांचा वापर करून झाल्यावर ही उत्पादने कचर्‍यात, रस्त्यावर, तसेच अन्यत्र टाकली जातात.

प्रश्‍न ऐकून पोलीस आयुक्त हसत हसत पत्रकार परिषदेतून निघून गेले

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे का ?, शवविच्छेदन अहवाल नेमका काय आला आहे ?, यांसारखे प्रश्‍न पुण्यामध्ये २ मार्च या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारले

पूजा चव्हाण हिचा मृत्यू जबर दुखापतीमुळे !

पूजा चव्हाण हिचा शवविच्छेदन अहवाल २ मार्च या दिवशी पोलिसांना मिळाला. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळे झाला आहे. पूजाचा मणका आणि डोके यांना गंभीर दुखापत झाली होती, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पारधी जक्कल काळे यांच्या गुंडगिरीमुळे प्रशासनाची धावपळ, तर ग्रामस्थ हैराण

मोठा फौजफाटा घेऊनही गुन्हेगार पकडला जात नसेल, तर  पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये त्रुटी आहे का, हे शोधावे लागेल. एका गावातील गुन्हेगाराचा बंदोबस्त करू न शकणारे पोलीस प्रशिक्षित आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?

सातारा नगर परिषदेचे अंदाजपत्रक फेटाळण्याची मागणी

सातारा नगरपालिकेने सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ आणि महाराष्ट्र लेखासंहिता नियम यांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे अंदाजपत्रक फेटाळण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे केली आहे.

गडचिरोली येथे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या टोळीकडून १ कोटी १५ लाख ६८ सहस्र रुपयांचा ऐवज जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना उघडपणे हत्येसाठी नेले जाते, याचा अर्थ कायदा-सुव्यवस्था हा प्रकार राज्यात अस्तित्वात आहे का ? असाच प्रश्‍न पडतो !

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर आणि डान्स बार आढळल्यास पोलीस अधिकार्‍यांना उत्तरदायी धरणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

हुक्का पार्लर प्रकरणी शिवसेनेने तारांकित प्रश्‍नोत्तराच्या वेळी ‘या प्रकरणी किती ठिकाणी कारवाई करण्यात आली ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.