पुण्यात १४४ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

शहर पोलीस दलातील १४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही पोलीस रुग्णालयात, तर काही जण गृह विलगीकरणात आहेत. पोलीसदलात आतापर्यंत १ सहस्र ७०० जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.

खाटा आणि रेमडेसिविर लसीच्या व्यवस्थापनात समन्वय ठेवा ! – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

‘रेमडेसिविर’चा लसीचा काळाबाजार होण्यापूर्वीच प्रशासनाने लसीचे योग्य प्रकारे नियोजन करून ते रुग्णांना देणे आवश्यक होते. आता काळाबाजार झाल्यानंतर असे निर्देश देऊन काय उपयोग ?

परिस्थिती चिंताजनक असल्याने उपचार निवडीच्या पर्यायात वेळ दवडू नका ! – सौ. किशोरी पेडणेकर

या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ रेल्वेचे २ सहस्र ८०० बेड्स सिद्ध आहेत. वरळी येथे ‘एन्.आय्.सी.ए.’मध्ये खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथे अडीच सहस्रपर्यंत खाटा सिद्ध करत आहोत.

पुणे शहरातील लष्करी रुग्णालयातील बेड कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून देणार ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

तसेच ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राला १ सहस्र १०० ‘व्हेंटिलेटर’ मिळतील, लसीची जितकी आवश्यकता आहे, तितका साठा केंद्राकडून देण्याचा निर्णय झालेला आहे.

‘रेमडेसिविर’ औषधाचे मूल्य निर्धारित करा !

‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनची किंमत ‘डीपीसीओ’ अंतर्गत निर्धारित करण्यात आली, तर सामान्य लोकांना इंजेक्शन सहज आणि सुलभ उपलब्ध होईल. त्यांच्यावर आर्थिक बोजाही पडणार नाही.

दळणवळण बंदीच्या दिवसांच्या निश्‍चितीअभावी आज पुन्हा ‘टास्क फोर्स’ ची बैठक !

११ एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ८ दिवसांची कडक दळणवळण बंदी असावी, असे मत मांडले, तर ‘टास्क फोर्स’ च्या सदस्यांनी दळणवळण बंदी १४ दिवसांची असावी, असे मत मांडले…..

महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक बंदीवान !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एकीकडे संक्रमित रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील एकूण कारागृहामध्ये कोरोनाबाधित बंदीवानांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यातील सर्व कारागृहांत २३ सहस्र २१७ बंदीवानांची क्षमता असतांना तेथे ३४ सहस्र ३२० बंदीवानांना ठेवण्यात आले आहे.

११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

१० एप्रिल या दिवशी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि अन्य राजकीय पक्ष यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह उपस्थित सर्वांनी दळवळणबंदीचे निर्बंध कडक करण्याला सहमती दर्शवली.

नगर येथे एकाचवेळी २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर एकाच शववाहिकेत कोंबले अनेक मृतदेह !

दिवसाला येथे २ सहस्रांवर नवे रुग्ण आढळून येत असून उपचार चालू असलेल्या रुग्णांची संख्या १२ सहस्रांच्या घरात गेली आहे. आतापर्यंत १ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे.

… मग राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन कोरोनावरील लस कशी दिली जाते ? – मुंबई उच्च न्यायालय

‘देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लस घेतली, मग महाराष्ट्रातील राजकीय नेते काही वेगळे नाहीत की, त्यांना घरी जाऊन लस देण्याची आवश्यकता भासावी.’