शासनाचे ‘जम्बो कोविड सेंटर्स’ खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘कोविड सेंटर्स’ मध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टर आल्यास उपचारासाठी साहाय्य होईल. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. यामध्ये तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असे खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राला कोरोना लसीचा लवकर पुरवठा करावा ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना, प्रमुख

महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली. ‘महाराष्ट्र राज्याला कोरोना लसीचा लवकर पुरवठा करावा’, याविषयीचे निवेदनही त्यांनी राज्यपालांना दिले. 

सोलापूर येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सात सदस्यीय समिती घोषित !

रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि वाटप प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात यावे, तसेच रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हास्तरीय ७ सदस्यांची समिती घोषित केली आहे.

नांदेड येथील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन !

१७ मार्च या दिवशी रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला होता. रावसाहेब अंतापूरकर हे कोरोनामुळे निधन झालेले भारत भालके यांच्यानंतरचे दुसरे विद्यमान आमदार आहेत.

नागपूर येथे कोविड रुग्णालयातील भीषण आगीत ४ रुग्णांचा मृत्यू

यापूर्वी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीतून प्रशासनाने ना कोणता धडा घेतला, ना उपाययोजना काढल्या. त्यामुळेच परत परत अशी आग लागत आहे. उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेसाठी अनुमती घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद !

केवळ गुन्हा नोंद करून वरवर कारवाई केल्याने राजकीय नेत्यांना पुनःपुन्हा गुन्हा करण्यास मोकळीकच मिळत आहे.

राज्य सरकारकडून कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात !

कोरोना महामारी संकटाच्या काळात नागरिकांना अशाप्रकारे लुबाडणार्‍या प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या शहा मेडिकला टाळे ठोकले !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आल्याने शहा मेडिकलला टाळे ठोकले

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाची महापालिकेच्या वॉररूमला भेट

सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रशासनाच्या वतीने राकेश शर्मा यांच्यासह दोघांचे पथक सांगलीत आले आहे.

खतांच्या किमती अल्प करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा ! – दादा भुसे, कृषीमंत्री

दरवाढीवरून राजकारण करण्याची ही वेळ नाही.