पुणे, ११ एप्रिल – येथील शहर पोलीस दलातील १४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही पोलीस रुग्णालयात, तर काही जण गृह विलगीकरणात आहेत. पोलीसदलात आतापर्यंत १ सहस्र ७०० जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.
शहर पोलीसदलातील ९५ टक्के कर्मचार्यांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ८५ टक्के पोलिसांनी लसीचा एक डोस घेतला आहे, तर १० टक्के पोलिसांनी दोन्ही डोस घेतले आहेत. काही कारणांमुळे ५ टक्के पोलिसांनी लस घेतलेली नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.