मराठवाडा आणि विदर्भ येथे भूकंप; जीवितहानी नाही !

मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील वाशीम येथे १० जुलै या दिवशी भूकंप झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परभणी अचानक भूमी हादरल्याने अनेक लोक भयभीत होऊन घराबाहेर आले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कासेगाव येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत !

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून १३ जून या दिवशी निघाली आहे. हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या कासेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत ९ जुलैला सायंकाळी पोचला.

‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’च्या वतीने वारकर्‍यांसाठी रेनकोट वाटप !

आषाढी वारीच्या निमित्ताने ‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’ यांच्या वतीने समतानगर येथील गेली १८ वर्षे दिंडीसाठी पायी चालत जाणार्‍या १५० वारकर्‍यांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी ‘रेनकोट’चे वाटप करण्यात आले.

आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे ! – विश्वजीत देशपांडे, परशुराम सेवा संघ

पुढील काळातील आव्हाने पेलतांना आपला इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे. येणार्‍या संकटाची चाहूल सर्वात आधी कळणारा ब्राह्मण समाज आहे.

महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर कारवाई करा ! – के. मंजूलक्ष्मी, प्रशासक, कोल्हापूर

पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या सिद्धतेचा आढावा ८ जुलै या दिवशी कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगर शहरात ‘ट्री गार्ड’सह शेकडो वृक्षांची लागवड !

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगरमधील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर्.टी.ओ.) आणि केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांची ‘ट्री गार्ड’ (झाडाच्या सुरक्षेसाठी लावलेला पिंजरा) लावून वृक्ष लागवड करण्यात आली.

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी महापालिकेची कार्यवाही चालू !

केवळ बक्षीस मिळवण्यासाठीच चांगली कामगिरी करण्यापेक्षा कायमच परिसर स्वच्छ रहाण्यासाठी उपाययोजना काढायला हव्यात !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये भारतीय संस्कृती नवीन पिढीला कळण्यासाठी वारीचा आकर्षक देखावा सिद्ध !

मॉल म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पाश्चिमात्य संस्कृती येते. अशातच संस्कृती जपण्याच्या उद्देशाने पुणे येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये एक अत्यंत अनोखा, सुंदर आणि अतिशय आकर्षक वारीचा देखावा सिद्ध करण्यात आला आहे.

भोलेबाबा यांच्यासह २० बाबांना ‘बनावट’ संबोधून काळ्या सूचीत टाकणार ! – आखाडा परिषद

हाथरस घटनेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले नारायण साकार हरि उपाख्य भोलेबाबा यांच्यासह २० बाबांना ‘बनावट’ संबोधून त्यांना काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. सर्व १३ आखाड्यांचे यावर एकमत झाले आहे.

महाराष्ट्रात शेकडो बोगस पॅथोलॉजी लॅब, कारवाईसाठी मात्र कायदाच नाही !

केवळ कायदे करूनही तसा कोणता लाभ आहे ? त्यांच्या कठोर अंमलबजावणीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अनैतिकता आणि गुन्हेगारी यांवर आळा घालण्यासाठी मूलगामी प्रयत्न होणे आवश्यक आहे, हे आपण कधी लक्षात घेणार ?