विद्यार्थ्याला वसतीगृह व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून मारहाण !

रोहनच्या पाठीवर काठीचे वळ उमटले असून तो गंभीर घायाळ झाला आहे. शिक्षकांनी त्याला वर्गातच कोंडून ठेवले.

सातारा येथे होणार ‘जिल्हा पालक संघा’ची स्थापना ?

कोरोनाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील खासगी शाळांची दादागिरी वाढत आहे. शाळांच्या त्रासाला कंटाळून सातारा येथील पालकांनी संघटित होत लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे ठरवले आहे.

कोरोनासंबंधी निर्बंधांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आणि आस्थापने यांच्यावर कठोर कारवाई करणार ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोना महामारीविषयी असलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी शासनाने दिली आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाची माहिती मुलांना शालेय जीवनातच मिळेल

अजूनही शौचालयेच ?

‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

इयत्ता १० वी आणि १२ वी ची परीक्षा ‘ऑफलाईन’ होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंतर्गत त्यांचा गृहपाठ सादर करायचा आहे. कोरोनामुळे यामध्ये काही अडचण आल्यास त्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.

सातारा येथील सैनिक स्कूलमधील ३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

दळणवळण बंदीमुळे गावाला गेलेलेे विद्यार्थी शाळेसाठी परतले आहेत. शाळेत आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. तेव्हा ३ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

देशातील ४२ सहस्र शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची, तर १५ सहस्र शाळांमध्ये शौचालयांची सोय नाही ! – केंद सरकारची माहिती

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे हे आतापर्यंतच्या  शासनकर्त्यांना लज्जास्पद ! सरकारने ही स्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत !

(म्हणे) ‘इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना अनुदान न मिळाल्यास या शाळांतील पालक आणि विद्यार्थी ते सहन करणार नाहीत !’ – ‘फोर्स’ संघटना

भावी पिढीची अधोगती करणार्‍या इंग्रजाळलेल्या पालकांच्या ताकदीला भीक घालायची का ?  ते सरकारने ठरवावे !

जुना आखाड्याद्वारे दुर्गम भागांत शाळा-महाविद्यालये यांची उभारणी करण्यात येणार

यासाठी जुन्या आखाड्याच्या वतीनेही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.