सातारा, १९ मार्च (वार्ता.) – दळणवळण बंदीमुळे गावाला गेलेलेे विद्यार्थी शाळेसाठी परतले आहेत. शाळेत आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. तेव्हा ३ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यांना शाळेतच विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, अशी माहिती सैनिक स्कूलचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन अशोक अरगडे यांनी दिली.