मक्का आणि मदिना येथील वाळवंटामध्ये दिसू लागली हिरवळ !

मुसलमानांसाठी पवित्र असणार्‍या मक्का आणि मदिना या सौदी अरेबियातील शहरांमधील वाळवंटामध्ये आता हिरवळ दिसू लागली आहे. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

(म्हणे) ‘भारताविरुद्ध ३ युद्धे लढल्यामुळेच आम्ही गरीब झालो !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

भारताने युद्ध लढण्यास सांगितले नव्हते, तर पाकलाच ती खुमखुमी होती आणि त्याचाच हा परिणाम आहे. हा परिणाम इतक्यावरच थांबणार नसून पाकची पुरती वाताहात होणार आहे, हे शरीफ यांनी लक्षात ठेवावे !

सौदी अरेबियात अमली पदार्थांच्या प्रकरणी १० दिवसांत १२ जणांना मृत्यूदंड

काही जणांचा तलवारीने शिरच्छेद, तर काहींना फासावर लटकवले !

भारताचे आखाती देशांच्या संबंधांमुळे पाकला किंमत चुकवावी लागू नये !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर पहिल्यांदा सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेले आहेत. एस्. जयशंकर यांनी सौदीचे महंमद बिन सलमान यांची जेद्दाह येथे भेट घेतली.

सौदी अरेबियातील मक्का मशिदीच्या माजी इमामाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सरकारच्या सुधारणावादी धोरणाला विरोध केल्याचा परिणाम !

विना अनुज्ञप्ती हज यात्रेवर गेलेल्या ३०० जणांना सौदी अरेबियामध्ये अटक  

विना अनुज्ञप्ती हजला येणार्‍यांना सौदी अरेबिया अटक करते, तर भारतात लाखोंच्या संख्येने घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांवर भारत काहीही कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !

सौदी अरेबियात मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा आदेश !

भारत असा निर्णय घेऊ शकत नाही; ‘या लोकांकडून विरोध होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचसमवेत या लोकांचे लांगूलचालन करणारे राजकीय पक्षही त्याला विरोध करतील’, हीच भीती सरकारी यंत्रणांना !

जम्मू-काश्मीरमधील विदेशी गुंतवणूक शिखर परिषदेत संयुक्त अरब अमिरातचा सहभाग

जम्मू-काश्मीरमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणुकीची क्षमता आहे. अशी गुंतवणूक भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यासाठी, विशेषतः काश्मीरसाठी लाभदायी आहे, असे या गटाचे नेतृत्व करणारे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला महंमद युसुफ यांनी सांगितले.

भारतात असे कधी होणार ?

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

आतंकवादी ‘जमात’ !

कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.