सौदी अरेबियातील मक्का मशिदीच्या माजी इमामाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सरकारच्या सुधारणावादी धोरणाला विरोध केल्याचा परिणाम !

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख)

मक्का मशिदीचा माजी प्रमुख इमाम शेख सालेह अल तालिब

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियातील एका न्यायालयाने मक्का मशिदीचा माजी प्रमुख इमाम शेख सालेह अल तालिब याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. वर्ष २०१८ मध्ये या इमामाला अटक करण्यात आली होती. त्याने सौदीमधील मनोरंजन क्षेत्राला नियंत्रित करणारी संस्था ‘जनरल एंटरटेनमेंट अ‍ॅथॉरिटी’वर टीका केल्याने त्याला अटक करण्यात आली होती. त्याने संगीत कार्यक्रमांचा विरोध केला होता.

सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान सध्या त्यांच्या देशात सुधारणावादी धोरण राबत आहेत. त्याला कट्टरतावादी मौलवी आणि इमाम विरोध करत आहेत. अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले जात आहे. त्यांतील तालिब एक आहेत.