विना अनुज्ञप्ती हज यात्रेवर गेलेल्या ३०० जणांना सौदी अरेबियामध्ये अटक  

२ लाख १० सहस्र रुपयांचा दंड

नवी देहली – सौदी अरेबियामध्ये विना अनुज्ञप्ती हज यात्रेवर गेलेल्या ३०० जणांना तेथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आता २ लाख १० सहस्र ६३३ रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाकडून यावर्षी केवळ १० लाख लोकांना यात्रेसाठी अनुमती देण्यात आली आहे. त्यातही विदेशातील ८ लाख ५० सहस्र लोकांनाच अनुमती देण्यात आली आहे. भारतातील ७९ सहस्र २३७ लोकांनाच यावर्षी अनुमती देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

विना अनुज्ञप्ती हजला येणार्‍यांना सौदी अरेबिया अटक करते, तर भारतात लाखोंच्या संख्येने घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांवर भारत काहीही कारवाई करत नाही, हे लज्जास्पद !