मक्का आणि मदिना येथील वाळवंटामध्ये दिसू लागली हिरवळ !

पैगंबरांनी सांगितलेल्या भविष्यानुसार ही घटना जगाचा अंत जवळ येण्याचा संकेत !

सौदीचे वाळवंट हिरवे झाले, जगाचा अंत जवळ येण्याचा संकेत !
(चित्रावर क्लिक करा)

रियाध (सौदी अरेबिया) – मुसलमानांसाठी पवित्र असणार्‍या मक्का आणि मदिना या सौदी अरेबियातील शहरांमधील वाळवंटामध्ये आता हिरवळ दिसू लागली आहे. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. येथे मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर महंमद पैगंबर यांच्या एका विधानाची चर्चा होऊ लागली आहे. पैगंबर यांनी १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी म्हटले होते, ‘जोपर्यंत अरब भूमीवर गवत उगवणार नाही आणि नद्या भरून वहाणार नाहीत, तोपर्यंत अंतिम काळ येणार नाही.’

सौदी अरेबियातील शहरांमधील वाळवंटामध्ये असलेली हिरवळ
ARCHAEOLOGISTS CONFIRM HADITH ABOUT A GREEN ARABIA!

 (स्त्रोत : IlmFeed) 

आता या दोन्ही गोष्टी होऊ लागल्याने ‘जगाचा अंत जवळ आला आहे’, असे स्थानिक लोकांकडून सांगितले जात आहे. ब्रिटीश दैनिक ‘द सन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार स्थानिक लोक म्हणत आहे की, ही स्थिती प्रलयाच्या जवळ जाण्याचे संकेत आहे. यात संपूर्ण जग नष्ट होईल. तज्ञांचे मत आहे की, अरब देशांतील वातावरणातील पालट हा हवामान पालटाचा परिणाम आहे.