भारताचे आखाती देशांच्या संबंधांमुळे पाकला किंमत चुकवावी लागू नये !

भारताचे परराष्ट्रमंत्री सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेल्याने पाकला भीती !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर (डावीकडे)आणि सौदीचे महंमद बिन सलमान

नवी देहली – भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर पहिल्यांदा सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेले आहेत. एस्. जयशंकर यांनी सौदीचे महंमद बिन सलमान यांची जेद्दाह येथे भेट घेतली. जयशंकर यांच्या या दौर्‍यामुळे भारत आणि आखाती देश यांच्यातील वाढत्या संबंधामुळे पाकिस्तानची चिंता वाढू लागली आहे. पाकचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी ‘सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या समवेतच्या भारताच्या वाढत्या संबंधांना पाकने गांभीर्यानं घ्यावेे. भारत आणि आखाती देश यांचे संबंध चांगले असावेत; मात्र त्यासाठी पाकिस्तानला किंमत चुकवावी लागू नये’, असे त्यांनी म्हटले आहे.

सौदी अरेबिया संकटात सापडलेल्या पाकला आतापर्यंत करत आला आहे. महंमद बिन सलमान आणि पाकमध्ये इम्रान खान यांचे सरकार असतांना दोन्ही देशांचे संबंध चांगले नव्हते; मात्र भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामधील संबंध सशक्त होत आहेत. सौदी अरेबिया भारतामध्ये गुंतवणूक वाढवत आहे. त्यामुळे पाक भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र त्याला यश आलेले नाही.