सौदी अरेबियात अमली पदार्थांच्या प्रकरणी १० दिवसांत १२ जणांना मृत्यूदंड

काही जणांचा तलवारीने शिरच्छेद, तर काहींना फासावर लटकवले !

सौदी अरेबियाचे प्रिन्स महंमद बिन सलमान

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियामध्ये अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्याखाली १२ जणांना मृत्यूदंड देण्यात आला. गेल्या १० दिवसांत काही जणांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला, तर काहींना फासावर लटकवण्यात आले. यामध्ये  पाकिस्तानचे ३, सीरियाचे ४, जॉर्डनचे २ आणि सौदीचे ३ नागरिक होते. यावर्षी मार्च मासामध्ये सौदी अरेबियाने तब्बल ८१ लोकांना फाशी दिली होती.

सौदी अरेबियाचे प्रिन्स महंमद बिन सलमान यांनी अशा प्रकारच्या शिक्षा अल्प करण्याचे आश्‍वासन दिले होते. ‘केवळ खून किंवा हत्याकांड यांत दोषी आढळलेल्यांनाच फाशीची शिक्षा दिली जाईल’, असे सांगत शिक्षा अल्प करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पुन्हा अशा प्रकारच्या शिक्षा देण्यात आली.

संपादकीय भूमिका

सौदी अरेबियामध्ये गुन्हेगारी अल्प असण्याचे हेच मोठे कारण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे ! भारतात अशा प्रकारच्या शिक्षा सर्वच गुन्ह्यांमध्ये दिल्या जाऊ लागल्या, तर गुन्हेगारी काही दिवसांतच प्रचंड प्रमाणात न्यून होईल, यात शंका नाही !