सकारात्मक मनोवृत्तीच्या निर्मितीसाठी ‘संस्कृत स्तोत्र पठण वर्गा’ला होणार प्रारंभ
मंत्रशक्तीने आपल्या शरीर आणि मन यांवर होणार्या सकारात्मक पालटांचा लाभ आपणास मिळावा, सकारात्मक मनोवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्रशक्तीने आपल्या शरीर आणि मन यांवर होणार्या सकारात्मक पालटांचा लाभ आपणास मिळावा, सकारात्मक मनोवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहस्रो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी संस्कृत भाषेमध्ये अनेक शोध लिहून ठेवले आहेत. अशा सर्वार्थाने आदर्श देववाणी संस्कृतला व्यावहारिक भाषा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे; म्हणून प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या मुलांना लहानपणापासून इंग्रजी नाही, तर संस्कृत भाषा शिकवणे आवश्यक आहे.’’ असे मत त्यांनी व्यक्त केले
स्वामी विवेकानंद यांना कोलकोताच्या वेदज्ञ पंडितांनी संस्कृतमध्ये प्रश्न विचारले. त्या वेळी स्वामीजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि आचरण यांविषयी प्रसंग येथे देत आहोत.
वेद हे विज्ञानाचे मूळ आहे; पण हे ज्ञान अरबस्तानातून पाश्चात्त्य देशांमध्ये पोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या नावाने त्याचा प्रचार केला, असा गंभीर आरोप भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी केला आहे.
संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी दिल्या जाणार्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत सन्मानजनक वाढ करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाकडून संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यांना ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार प्रदान केला जातो. मागील १० वर्षांत या पुरस्काराच्या रकमेत १ रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही.
संस्कृत ही ईश्वरनिर्मित भाषा असून त्याला ‘देवभाषा’ म्हटले जाते. गेली लक्षावधी वर्षे या भाषेचा उपयोग सनातन हिंदु धर्मीय करत आले आहेत. एक माजी सरन्यायाधीश अशी मागणी करत असतांना केंद्र सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करावा, असेच संस्कृतप्रेमींना वाटते !
‘ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वर्ष २०२३ ची भारतीय जनगणना शेवटच्या टप्प्यात आहे. जनगणना अधिकारी माहिती गोळा करण्यासाठी तुमच्या घरी येतील. तेव्हा ते तुम्हाला ‘मातृभाषेच्या खेरीज आणखी कोणत्या भाषा येतात ?’, असे विचारतील. या वेळी तुम्ही सनातनी हिंदु असल्याने कृपा करून ‘संस्कृत येते’, असे सांगण्यास विसरू नका.
देशाच्या एका माजी सरन्यायाधिशांनी अशा प्रकारचे विधान करणे, ही मोठी गोष्ट आहे. केंद्र सरकारने याविषयी गांभीर्याने विचार करावा, असे धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणासह संस्कृत भाषेच्या अंतर्गत श्रीमद्भगवद्गीता आणि अन्य हिंदु धार्मिक ग्रंथ यांचा समावेश करण्यात आला आहे.