इंग्रजी भाषेखेरीज हिंदी आणि संस्कृत या भाषांचा स्वीकार केल्यानेही देश विकसित होऊ शकतो !

पू. तनुजा ठाकूर

‘इंग्रजांच्या इंग्रजी भाषेसाठी आजची युवा पिढी पूर्णत: वेडी झाली आहे. इंग्रजांनी ज्या ७० देशांवर राज्य केले, त्या सर्व देशांपैकी चीन, जर्मनी असे ११ देश सोडल्यास अन्य सर्वांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार केला; परंतु आज ते ११ देश अतीविकसित आहेत. जर हे देश इंग्रजी भाषेखेरीज विकसित होऊ शकतात, तर त्या तुलनेत आपल्या हिंदीचे व्याकरण तर अतीविशाल आहे. त्याचसमवेत संस्कृत तर महासागराप्रमाणे आहे. संस्कृतचे महत्त्व आता सर्वजण मान्य करू लागले आहेत. असे आहे, तर आपण विकसित का होऊ शकत नाही ? ‘हिंदीचा स्वीकार करा, इंग्रजीला हटवा आणि देश वाचवा !’, या घोषवाक्यानुसार प्रयत्न करूया.’

(साभार : पू. तनुजा ठाकूर, संपादिका, मासिक ‘वैदिक उपासना’, १३ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२०)