पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ पलूस (जिल्हा सांगली) येथे मोर्चा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ पलूस येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पलूस बसस्थानकापासून चालू झालेला मोर्चा शिवतीर्थावर समाप्त झाला.

सांगली जिल्‍ह्यातील टंचाईसदृश परिस्‍थितीत लोकांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे आहे ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

पाणीपुरवठ्याच्‍या योजना चालू करून पाण्‍याचा प्रश्‍न मार्गी लावला, तरी सांगली जिल्‍ह्यातील टंचाईसदृश परिस्‍थितीत लोकांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे मी आणि भाजप उभा आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्‍ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

रस्‍त्‍याचे काम होत नसल्‍याने विटा (जिल्‍हा सांगली) येथे दांपत्‍याचा आत्‍महत्‍येचा प्रयत्न !

संघर्ष करूनही रस्‍ता मिळत नसल्‍याने विटा (जिल्‍हा सांगली) येथे प्रशांत आणि स्‍वाती कांबळे या दांपत्‍याने ‘फेसबुक लाईव्‍ह’ करत आत्‍महत्‍येचा प्रयत्न केल्‍याची घटना घडली.

महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने क्रांतीशाहीर दीक्षित यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी !

येथे महाराष्ट्र शाहीर परिषद आणि लोककलावंत विकास परिषद सांगली यांच्या वतीने क्रांतीशाहीर कै. ग.द. दीक्षित यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

वर्ष २०१९ च्या पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट मासांत कृष्णा खोर्‍यात अती पर्जन्यमानामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या भागातील पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना कामांसाठी जागतिक बँक अर्थसाह्य करणार आहे.

‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी १५ गावांनी बंद पाळत काढला जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

सांगली जिल्‍ह्यातील मिरज तालुक्‍यामधील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नावाने उभारल्‍या जात असलेल्‍या कमानीचे खांब पाडल्‍याच्‍या प्रकरणी सरपंच, उपसरपंच यांसह तिघांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत.

संभाव्य आपत्तीत स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सिद्ध ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

संभाव्य आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या अनुषंगाने स्थानिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. पावसाचा वाढता जोर पहाता स्थानिकांनीही याविषयी तात्काळ माहिती द्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्‍या बाहेर !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात चालू असलेल्‍या संततधार पावसाने कोल्‍हापूर शहरात १९ जुलैला पंचगंगा नदी रात्री ११.१५ वाजता नदीच्‍या पात्राच्‍या बाहेर पडली. सध्‍या नदीच्‍या पाण्‍याची पातळी ३२ फूट असून केवळ एका दिवसात १० फूट पाणी वाढले आहे.

आज विशाळगड येथील अतिक्रमणाच्‍या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकणार ! – नितीन शिंदे

शूर मावळ्‍यांच्‍या बलीदानाने पावन झालेल्‍या विशाळगडावर धर्मांधांनी अवैध अतिक्रमण करून संपूर्ण गड विद्रुप केला आहे. त्‍याच्‍या विरोधात सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने गुरुवार, १३ जुलैला सांगली येथे सकाळी १०.३० वाजता लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंदिर येथे आंदोलनाचे रणशिंग फुंकण्‍यात येणार आहे

गोवा एक्‍सप्रेसमधील ‘स्‍लिपर कोच’ न्‍यून केल्‍याने प्रवाशांना अनेक अडचणी !

गोवा एक्‍सप्रेसमधील शयनयान डब्‍यांची संख्‍या न्‍यून केल्‍यावर प्रवाशांना कोणत्‍या अडचणी येतील, याचा अभ्‍यास प्रशासनाने केला नाही का ? अभ्‍यास न करता निर्णय घेतल्‍याने प्रवाशांना येणार्‍या अडचणींचे दायित्‍व कुणाचे ? सारासार विचार न करता जनतेला त्रास होईल, असे निर्णय घेणारे प्रशासन काय कामाचे ?