सांगली जिल्‍ह्यातील टंचाईसदृश परिस्‍थितीत लोकांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे आहे ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सांगली जिल्‍ह्याचे खासदार संजयकाका पाटील

सांगली, १ ऑगस्‍ट (वार्ता.) – सांगली जिल्‍ह्यात यंदा पाऊस लांबल्‍याने जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव येथे शेती आणि पिण्‍याचे पाणी यांची टंचाई होईल, अशी परिस्‍थिती होती. त्‍यातून लोकांना दिलासा देण्‍यासाठी टेंभू, म्‍हैशाळ, ताकारी या पाणीपुरवठ्याच्‍या योजना चालू करून पाण्‍याचा प्रश्‍न मार्गी लावला, तरी सांगली जिल्‍ह्यातील टंचाईसदृश परिस्‍थितीत लोकांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे मी आणि भाजप उभा आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्‍ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी भाजप प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडिलकर उपस्‍थित होते.

१. काही शेतकर्‍यांना शेतीची आलेली देयके आणि त्‍यावर व्‍याज हे प्रचंड असून त्‍यावरील व्‍याज अल्‍प करण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्नशील आहोत.

२. शेतकर्‍यांचा विजेचा भार आणि देयक अल्‍प होण्‍यासाठी सौर ऊर्जेचा प्रकल्‍प लवकरच कार्यान्‍वित होणार आहे. हा प्रकल्‍प साधारणत: दोन मासांत अंतिम होईल आणि तो पूर्ण होण्‍यासाठी २ वर्षांचा कालावधी लागेल.

३. सलगरे येथे ‘मल्‍टिमिडिया लॉजिस्‍टिक पार्क’साठी भूमीचे प्रयत्न चालू असून हा प्रकल्‍प झाल्‍यावर जिल्‍ह्यातील चित्र पालटेल.

४. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्‍या संदर्भात वक्‍तव्‍य केले असे सांगितले जाते, ते चुकीचे असून त्‍याचा मी निषेध करतो.