आज विशाळगड येथील अतिक्रमणाच्‍या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकणार ! – नितीन शिंदे

बैठकीत माहिती देतांना श्री. नितीन शिंदे, तसेच अन्‍य

सांगली – छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेल्‍या आणि बाजीप्रभु देशपांडे अन् फुलाजीप्रभु देशपांडे आणि कित्‍येक शूर मावळ्‍यांच्‍या बलीदानाने पावन झालेल्‍या विशाळगडावर धर्मांधांनी अवैध अतिक्रमण करून संपूर्ण गड विद्रुप केला आहे. त्‍याच्‍या विरोधात सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने गुरुवार, १३ जुलैला सांगली येथे सकाळी १०.३० वाजता लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंदिर येथे आंदोलनाचे रणशिंग फुंकण्‍यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी दिली आहे. या संदर्भात एक व्‍यापक बैठक घेण्‍यात आली. या वेळी भाजप, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, विहिंप, मावळा प्रतिष्‍ठान, बजरंग दल, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, तसेच इतर हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्‍थित होते.