हिंदु तरुणीवर धर्मांधाचा लैंगिक अत्याचार !

येथील एका हिंदु डॉक्टर तरुणीची मिरज येथील अल्तमशा शिरोळकर याच्याशी ओळख झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ओळख वाढल्यावर अल्तमशा याने पीडित तरुणीवर तिच्या घरातच बळजोरी करत लैंगिक अत्याचार केला.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम !

८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजता अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांची सायकलफेरी आणि सकाळी १० ते दुपारी ४ कर्मचार्‍यांसाठी आरोग्य पडताळणी शिबिर होईल. ९ फेब्रुवारीला ११ वाजता मुख्यालयात दीपप्रज्वलन होईल.

राज्य परिवहन महामंडळाची सांगलीहून कुंडल येथे जाणारी बस वाटेतच बंद पडली !

राज्य परिवहन महामंडळाची सांगलीतून कुंडल येथे जाणारी (एम्.एच्.१४ बी.टी. १०६६) या क्रमांकाची बस पाचवा मैल येथे आल्यावर नादुरुस्त झाल्याने ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता बंद पडली.

ठाकरे गटाची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने !

जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाच केला.

सौ. नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत् सूत्रधारी आस्थापनाच्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती !

ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने करण्यात आली. या निवडीविषयी त्यांचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

केदार खाडिलकर आणि संजय परमणे यांची ‘सांगली जिल्हा टेलिकॉम ॲडव्हायजरी कमिटी’चे सदस्य म्हणून नियुक्ती !

‘सहकार भारती’चे प्रदेश संघटनप्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक श्री. संजय परमणे, तसेच भाजपचे सांगली लोकसभा माध्यम प्रबंधक अन् प्रसिद्ध रंग व्यापारी श्री. केदार खाडिलकर यांची ‘सांगली जिल्हा टेलिकॉम ॲडव्हायजरी कमिटी’चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास आंदोलन ! – साथीदार युथ फाऊंडेशन

१६ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन ‘साथीदार युथ फाऊंडेशन’च्या वतीने उपायुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.

श्रीराममंदिराची प्रतिकृती पहाण्यासाठी भाविकांचा प्रतिसाद : प्रतिदिन होम-हवन !

अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने मिरज शहरात श्रीराममंदिराची प्रतिकृती तालुका क्रीडा संकुल येथे उभारण्यात आली आहे.

मुख्य कार्यक्रमात व्यासपिठावर केवळ २ साहित्यिक, तर १२ राजकारणी असणार !

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये मंचावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार आहेत, तर १२ राजकारण्यांना निमंत्रित म्हणून स्थान दिले आहे, असे पत्रिकेतील माहितीवरून दिसून येते.

मिरज येथे महापालिकेत डॉ. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन !

कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार निम्मे बंद करून त्याच्यासमोरच बसल्याने कामासाठी ये-जा करणार्‍या नागरिकांची कुचंबणा झाली.