सांगली आणि मिरज भगवेमय झाले !

सांगली शहरातील विश्रामबाग चौक, श्रीराम मंदिर चौक, टिळक चौक, गावभाग, राममंदिर चौक, गणपति पेठ, बालाजी चौक, मारुति रोड, रतनशीनगर, सराफ कट्टा, बसस्थानक परिसर येथे सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.

सांगली येथे लिंगायत समाजाचा अड्डपालखी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला !

सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज, शिवबसव सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने १६ ते २४ जानेवारी या कालावधीत आध्यात्मिक आशीर्वचन आणि संगीत शिवकथेचे आयोजन येथील तरुण भारत स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते.

गडकोट मोहिमेसाठी जाणार्‍या सांगली येथील धारकर्‍यांना सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२४ ची धारातीर्थ यात्रा अर्थात मोहीम ही २४ ते २८ जानेवारी या कालावधीत दुर्ग श्रीरायरेश्वर ते श्रीप्रतापगड (मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर) अशी होत आहे.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये !- डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्र्रध्वजाच्या उचित वापराविषयी प्रावधान केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्र्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’स उत्स्फूर्त प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.

सांगली येथे ‘मंगल कलश शोभायात्रा’ आणि ‘श्री तुलसीदास रामायण कथा वाचन’ यांचे आयोजन ! 

अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण महोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री बालाजी मंदिर संचालित श्री सीताराम मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘भव्य मंगल कलश शोभायात्रा’ आणि ४ दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मिरज येथे श्रीराममंदिराची साकारली जात आहे भव्य प्रतिकृती !

२० सहस्र चौरस फूट क्षेत्र, ६३ फूट उंची, २२ शिखरे, १ कळस, १५० कमानी आणि १६७ खांब असणारी भव्य प्रतिकृती साकारण्याचे काम येथील तालुका क्रीडा संकुल मैदान येथे चालू आहे.

सांगली येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे उत्साहात स्वागत !

महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी १९ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा चालू रहाणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘निर्धार फाऊंडेशन’चे राकेश दड्डणावर यांचा सत्कार !

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘देशाला राकेशसारख्या युवकांची आवश्यकता आहे. त्यांचे स्वच्छता अभियान खरोखरच कौतुकास्पद आहे. हीच खरी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्र्रनिष्ठा आहे.’’

कोंगनोळी (जिल्हा सांगली) येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील अक्षतांच्या मंगल यात्रेचे उत्साहात स्वागत !

ही ग्राम प्रदक्षिणा यात्रा माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल वाजवत, भजने म्हणत पारंपरिक वाद्ये वाजवत पार पडली.