सांगली – येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सौ. नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत् सूत्रधारी आस्थापनाच्या (वीज विभागाच्या ३ आस्थापनांचे समन्वय करणारे आस्थापन) स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने करण्यात आली. या निवडीविषयी त्यांचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.