सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम !

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा २६ वा वर्धापनदिन ९ फेब्रुवारी या दिवशी असून त्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजता अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांची सायकलफेरी आणि सकाळी १० ते दुपारी ४ कर्मचार्‍यांसाठी आरोग्य पडताळणी शिबिर होईल. ९ फेब्रुवारीला ११ वाजता मुख्यालयात दीपप्रज्वलन होईल. महापालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात महापालिकेच्या ‘मोबाईल ॲप’चा शुभारंभ होईल. दुपारी १२.३० वाजता त्रिकोणी बागेजवळ मध्यवर्ती निदान केंद्रात आरोग्य पडताळणीच्या नवीन यंत्राचे उद्घाटन होईल. यानंतर १०, ११ फेब्रुवारीलाही विविध कार्यक्रम होतील, अशी माहिती जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली आहे.