सांगली – ‘सहकार भारती’चे प्रदेश संघटनप्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक श्री. संजय परमणे, तसेच भाजपचे सांगली लोकसभा माध्यम प्रबंधक अन् प्रसिद्ध रंग व्यापारी श्री. केदार खाडिलकर यांची ‘सांगली जिल्हा टेलिकॉम ॲडव्हायजरी कमिटी’चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दूरसंचार क्षेत्रात सुधारणा सुचवणे, सल्ला देणे यांसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या नियुक्तीविषयी ‘बी.एस्.एन्.एल्.’चे महाप्रबंधक के.व्ही.राव यांनी श्री. परमणे आणि श्री. खाडिलकर यांचा सन्मान केला. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.