गणेशोत्‍सव आणि अन्‍य हिंदु सण परंपरांच्‍या संदर्भात शासनाने ठोस मार्गदर्शक सूत्रे घोषित करावीत ! – गिरीश जोशी, मूर्तीकार

शाडू मातीच्‍या श्री गणेशमूर्तींची मागणी वाढली !

आजपासून तासगाव येथील श्री गणपति पंचायतन देवस्‍थानचा २४४ वा गणेशोत्‍सव !

भाद्रपद शुक्‍ल प्रतिपदा म्‍हणजे १६ सप्‍टेंबरपासून तासगाव येथील श्री गणपति पंचायतन देवस्‍थानचा २४४ वा गणेशोत्‍सव प्रारंभ होत आहे.

किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) येथील रेल्वेस्थानकात सुविधा द्या ! – किर्लाेस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना 

सांगली जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांसाठी, तसेच पलूस, तासगाव, कडेपूर, खानापूर आणि वाळवा या तालुक्यांतील गावांसाठी किर्लोस्करवाडी हे नजीकचे अन् सोयीचे रेल्वेस्थानक आहे. सद्यःस्थितीत या स्थानकावर केवळ २ ‘पॅसेंजर’ आणि ३ जलद (एक्सप्रेस) गाड्यांना थांबा आहे. अ

हिंदू मातंग समाजाचे मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सांगलीत मोर्च्याचे आयोजन !

हिंदू मातंग समाजाचे मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी समाजाच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. विलिंग्डन कॉलेजपासून मोर्च्यास प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

‘सातारा-कोल्हापूर’ पॅसेंजर गाडीची ब्रेकिंग यंत्रणा निकामी झाल्याने गाडी दीड घंटे विलंबाने !

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सहस्रो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली ‘सातारा-कोल्हापूर’ पॅसेंजर सध्या प्रवाशांची परीक्षा पहात आहे. ८ सप्टेंबरला गाडीची ‘ब्रेकिंग यंत्रणा’ निकामी झाल्याने ती हातकणंगले स्थानकात बराच काळ थांबली.

मराठा आरक्षणास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

७ सप्‍टेंबर या दिवशी होणार्‍या ‘सांगली बंद’ला श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा सांगली – मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, यासाठी जे आंदोलन चालू आहे, त्‍या आंदोलनास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा आहे. ही समस्‍या न्‍यायालयीन मार्गाने आणि सर्वांच्‍या सहकार्याने सुटून त्‍यातून मार्ग निघावा अन् मराठा समाजास आरक्षण मिळावे. अन्‍य समाजाला ज्‍याप्रकारे आरक्षण आहे, त्‍याप्रकारे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. … Read more

राकेश दड्डणावर यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्त २५ बहावाच्‍या रोपांचे वृक्षारोपण !

सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अध्‍यक्ष श्री. राकेश दड्डणावर यांच्‍या २५ व्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने शिंदे मळा येथे २५ बहावाच्‍या रोपांचे वृक्षारोपण करण्‍यात आले.

सांगली महापालिका क्षेत्रात लवकरच १०० ‘इ-बस’ चालू होणार !

लवकरच सांगली महापालिका क्षेत्रात ‘इ-बस’ चालू होणार आहे. ही सेवा चालू करण्यासाठी शासन महानगरपालिकेला १०० ‘इ-बस’ देणार आहे, अशी माहिती सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

राजे प्रतापसिंह पटवर्धन यांना सांगलीकरांच्या वतीने अभिवादन !

सांगलीचे युवराज राजे प्रतापसिंह यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने  मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले.

अभाविप सांगली जिल्ह्यात २० सहस्र नवीन उद्योजक सिद्ध करणार !

या यात्रेच्या कालावधीत उद्योजकता विकास रथ सांगली जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३६ महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यान, चित्रफित, पत्रके आदींच्या माध्यमातून युवकांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करणार आहेत.