सांगली येथे पूर ओसरताच पूर बाधित भागात स्वच्छता मोहीम जोमाने चालू !

पूर ओसरल्यानंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. पाणीपातळी अल्प होईल तशी स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.

सांगली येथील कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फुटांवर !

कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फूट ३ इंच, तर मिरज येथील कृष्णा घाटावर नदीची पातळी ५२ फूट ४ इंच पोचली आहे. काळजी म्हणून सैन्याची एक तुकडी सांगली येथे आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘अफझलखानवधाचे शिल्प’ आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उभे करा !

आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव दूर करून ‘श्री शिवप्रतापभूमी अर्थात अफझलखानवधाचे शिल्प’ प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे….

थोडक्यात पण महत्वाचे : शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !…. कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !

शिळफाटा रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेला. या दुचाकीला भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने गंभीर घायाळ झालेल्या कामोठे येथील सागर मिसाळ याचा मृत्यू झाला.

सांगली येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ३३ फूट !

पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे ६ द्वार दीड फुटांनी उचलून विसर्ग चालू केला आहे. सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पूर परिस्थितीची पहाणी केली.

‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना !

माजी आमदार नितीन शिंदे यांचा ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून समावेश !

राज्यातील २४५ उपसा जलसिंचन संस्थांच्या थकित मुद्दलाची रक्कम राज्यशासन देणार !

सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकित कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी सांगलीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. 

सध्याच्या काळात हिदूंना संघटित करून दबावतंत्राचा वापर केला पाहिजे ! – भगवंत जांभळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदूंनी पीडित हिंदु तरुणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून रोखठोक भूमिका घेतली पाहिजे, तसेच हिंदूंना संघटित करून त्याद्वारे दबावतंत्राचा वापर केला पाहिजे, असे परखड मत मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे यांनी येथे व्यक्त केले.

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या दिशेने !

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कृष्णा नदीतील पाणी पात्राच्या बाहेर पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जवळच्या परिसरात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची सिद्धता चालू केली आहे.

अर्थसंकल्पात गरीब वर्ग, युवक, शेतकरी आणि महिला यांचा विकास अन् प्रगती यांना प्राधान्य ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार

केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांचा विकास अन् प्रगती यांना पूर्ण प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषित केल्या आहेत.