शिवसेनेच्या वतीने महाआरती !
सांगली, ७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील मगरमच्छ कॉलनी, वॉटरहाऊस शेजारी श्री म्हसोबा मंदिराची २ ऑगस्ट या दिवशी शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे गोरक्षक सेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. या वेळी दिवंगत वसंतदादा पाटील स्मारक परिसरातील दुर्लक्षित असलेल्या या मंदिराची शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे गोरक्षक सेनेच्या वतीने स्वच्छता करून सुशोभिकरण करण्यात आले.
या महाआरतीला हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे, सर्वश्री शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर, तालुका प्रमुख श्री. विनायक एडके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख राणीताई कमलाकर, उपशहर प्रमुख श्री. कुमार राठोड, शिवसैनिक सर्वश्री अभिमन्यू भोसले, सुधीर चव्हाण, प्रसाद जाधव, आकाश शिंदे, रणजीत जाधव, चेतन गायकवाड यांसह अनेक गोरक्षक आणि शिवसैनिक उपस्थित होते.
गोरक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. विनायक एडके, सर्व सहकारी गोरक्षक आणि शिवसैनिक यांनी श्री म्हसोबा मंदिरात स्वच्छता, सुशोभिकरण आणि नित्यनैमित्तिक आरती करण्याच्या धार्मिक उपक्रमाचे श्री. नितीन शिंदे यांनी कौतुक केले आणि ‘सर्व सहकार्य करू’, असे सांगितले.