सांगली, ६ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) येथे १६८ धर्मांधांची अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून पाडली पाहिजेत, तसेच विशाळगडावर मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी भाग्यनगर (हैद्राबाद) येथून पैसे घेऊन उद्योगपती येतोच कसा ? कोण हा उद्योगपती ? त्याला धडा शिकवला पाहिजे. आमदार काय करत आहेत ? तेथे आलेल्या मुसलमान उद्योगपतीची माहिती मिळाली पाहिजे. यासाठी मी न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे, असा घणाघात हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी येथे दिली.
येथील कच्छी जैन भवन येथे ४ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२ वाजता ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण समिती’मध्ये श्री. नितीने शिंदे यांची ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड झाल्याविषयी आयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात गायत्री परिवाराचे सर्वश्री मनोहर सारडा, नरेंद्र जानी आणि भाजपचे नेते दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवभक्त यांच्या हस्ते श्री. नितीन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिवभक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटासह जोरदार घोषणा दिल्या.
श्री. नितीन शिंदे म्हणाले की, प्रतापगडावर आता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्याचा मोठा पुतळा उभा करणार आहोत. विशाळगडावरील इस्लामिक अतिक्रमण आणि मुसलमान सरदार ‘हजरत-पीर-मलिक-ए-रेहान’च्या नावाने असलेला अनधिकृत दर्गाही उद्ध्वस्त करायला लावणार आहे. गडांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विधीमंडळात कट्टर हिंदुत्वनिष्ठ विचारांचा शिवभक्त आमदार निवडून गेला पाहिजे. आजच्या कार्यक्रमात लोकांच्या मागणीचा आदर राखून मी पक्षाकडे हिंदुत्वनिष्ठ उमेदवार म्हणून मला संधी द्यावी, अशी मागणी करतो.
या वेळी बोलतांना अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या की, राज्यातील एकंदरीत परिस्थिती पहाता विधानसभेमध्ये हिंदूंचे प्रश्न मांडण्यासाठी कट्टर हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी आमदाराची आवश्यकता आहे अन् ती आवश्यकता माजी आमदार नितीन शिंदे भरून काढू शकतात.
श्री. मनोहर सारडा म्हणाले की, भाजपने माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासारख्या कडव्या हिंदुत्वनिष्ठ आणि लोकनेत्याला उमेदवारी दिल्यास त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे राहू. गायत्री परिवाराचे श्री. नरेंद्र जानी म्हणाले की, गणेशोत्सवातील मंडपात हिंदू मद्य पिऊन नाचतात. ही किती शरमेची गोष्ट आहे. हिंदूच त्यांच्या देवतांचा अवमान करण्याचे पाप करत आहेत. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.