रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे ‘डॉलर’ आणि ‘युरो’ यांना फटका ! – रशियाचा दावा

अनेक दशके अमेरिकी डॉलर हे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले होते; परंतु यापुढे त्याला उतरती कळा लागेल.

ब्रिटनला यापुढे ‘रशियन गॅस’चा पुरवठा करणार नाही ! – रशिया

युरोपीय देश रशियाचे कच्चे तेल आणि गॅस यांवर अवलंबून असल्याने रशियाची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

विविध देशांचे रशियाशी असलेल्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करणार नाही ! – अमेरिकेचे स्पष्टीकरण

कोणत्याही देशाचे अन्य देशांची असलेले संबंध बिघडवण्याचा अधिकार अमेरिकाला कुणीही दिलेले नाही, हेही त्याने कामयच लक्षात ठेवायला हवे !

(म्हणे) ‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया भारताच्या बाजूने उभा रहाणार नाही !’ – अमेरिका

भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको !

रशियाकडून विषप्रयोग झाल्याच्या संशयामुळे युक्रेनकडून चर्चेत सहभागी झालेल्यांसाठी नियमावली !

रशियाने युक्रेनचा दावा फेटाळला असला, तरी युक्रेनला कोणताही धोका पत्करायचा नाही.

पुतिन सत्तेवर राहू शकत नाहीत ! – जो बायडेन यांची टीका

जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.

पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ६ दिवसांत पाचव्यांदा वाढ !

देशात इंधनाचा भडका चालूच आहे. मागील ६ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात पाचव्यांदा वाढ झाली आहे. २७ मार्च या दिवशी पेट्रोल ५० पैशांनी, तर डिझेल ५५ पैशांनी महाग झाले. एकूण ६ दिवसांत ३ रुपये ७५ पैशांपर्यंत इंधन दरवाढ झाली आहे.

रशियाने उत्तर अटलांटिक महासागरात तैनात केल्या आण्विक पाणबुड्या !

पाश्चात्त्य देशांच्या गुप्तचर संघटना पुतिन यांच्या आण्विक शस्त्रांच्या ताफ्यावर लक्ष ठेवून आहेत.

युद्धाचा पहिला अध्याय संपला असून दुसरा चालू झाला आहे ! – रशिया

रशियाचे सैन्याधिकारी सर्गेई म्हणाले की, या काळात युक्रेनच्या सैन्यशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. यामुळेच आम्ही आता आमच्या मुख्य लक्ष्याकडे (डोनबास शहरावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याकडे) लक्ष केंद्रित करणार आहोत.

युक्रेनने रशियन सैन्यावर केली ‘शक्तीशाली आक्रमणे’ ! – युक्रेन

युक्रेनच्या सैन्याने २५ मार्च या दिवशी मोठी कामगिरी केल्याचा दावाही केला गेला आहे. युक्रेनी सैन्याने राजधानी कीवजवळील ३ शहरे रशियाच्या कह्यातून मुक्त केली आहेत.