मॉस्को – प्रसिद्ध रशियन पत्रकार दर्या हिची हत्या क्रूर आणि क्लेषदायी आहे, अशी प्रतिक्रिया रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केली. २० ऑगस्ट या दिवशी तिची हत्या झाली. पत्रकार दर्या ही पुतिन यांचे निकटवर्तीय सहकारी अॅलेक्सझँडर डुगिन यांची मुलगी होती.
Russia accuses Ukraine of killing journalist and daughter of Putin ally Darya Dugina https://t.co/qMKkEseJ7E
— BBC News (World) (@BBCWorld) August 22, 2022
१. या हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप करण्यात आलो; मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळून लावत ‘उलट रशिया ही संधी साधून युक्रेनवर प्रतिआक्रमण करू शकतो’, असा आरोप केला आहे. यासाठी युक्रेनने नागरिकांना सतर्क रहाण्याची चेतावणीही दिली आहे.
२. पुतिन यांचा ‘मेंदू’ समजले जाणारे अॅलेक्सझँडर डुगिन यांनी त्यांच्या कन्येच्या हत्येविषयी म्हटले की, रशियाच्या शत्रूंनी तिची हत्या केली; परंतु यामुळे आम्ही रशियन नागरिक गप्प बसणार नाही. आम्हाला केवळ विजय हवा आहे आणि त्यासाठीच माझ्या मुलीने प्राणार्पण केले, असे मी समजतो.