‘पेस’ या युरोपीय देशांच्या परिषदेतून रशियाची हकालपट्टी !

‘पेस’ म्हणजे ‘पार्लियामेंट्री असेंब्ली ऑफ द कॉन्सिल ऑफ युरोप’ (युरोपीय परिषदेची संसदीय विधानसभा) या युरोपीय संघटनेने रशियाची हाकालपट्टी केली आहे. ‘रशियन टीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार २१९ सदस्यांपैकी २१६ जणांनी रशियाच्या विरोधात मत दिले.

रशिया-युक्रेन युद्ध तातडीने थांबवा ! – आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध तातडीने थांबवावे, असा आदेश येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’ने) दिला.

(म्हणे) ‘भारताने रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतले, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील !’

अमेरिकेची भारताला अप्रत्यक्ष धमकी
स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणार्‍या अमेरिकेने ‘भारताने काय करावे आणि काय करू नये’, हे सांगण्याची आवश्यकता नाही !

रशियाची सावकाश आगेकूच !

कीव शहराच्या आत घुसून तेथील प्रत्येक इमारतीमधील सैनिकांना मारल्याविना रशियाच्या सैन्याला हे युद्ध जिंकणे कठीण असणे

रशियाकडे केवळ १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक ! – अमेरिकेच्या माजी सैन्यदल प्रमुखाचा दावा

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २० दिवस झाले असले, तरी ते अद्याप थांबलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रशियाकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या १० दिवसांत युक्रेनने खिंड लढवली, तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी सैन्यदल प्रमुख बेन होजेस यांनी केला आहे.

रशियाकडून युद्धाच्या २० व्या दिवशीही युक्रेनवर आक्रमणे चालूच !

रशियाकडून येथील रहिवासी इमराती आणि एक मेट्रो स्थानक यांवर १५ मार्चच्या सकाळी हवाई आक्रमणे करण्यात आली. एका इमारतीवर केलेल्या आक्रमणात २ जण ठार झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.

युद्ध चालू आहे !

भारताने पोखरणमध्ये दुसर्‍यांदा अणूबाँबचे परीक्षण केल्यावर जगाने भारतावर, विशेष करून अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घातले; मात्र त्याचा भारतावर विशेष काही परिणाम झाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. तसेच रशियाचे झाल्यास आश्चर्य वाटू नये. रशियाकडे इंधन आणि गॅस हे हुकूमाचे एक्के आहेत. त्यांच्या बळावरच रशिया अमेरिका आणि युरोप यांना खेळवणार आहे, हे नक्की !

आंतरराष्ट्रीय युद्धात डावपेच खेळणारा धूर्त रशिया !

रशियाने युद्धाची पूर्वसिद्धता करून ठेवल्यामुळे त्याला युद्धाचे परिणाम भोगण्यास वेळ लागणे

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, ‘नार्काे टेरिरिझम’ आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.

श्रीलंका ‘दिवाळखोर देश’ घोषित होण्याच्या उंबरठ्यावर !

भारतात असे होऊ नये, यासाठी भारताने तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या संदर्भात स्वयंपूर्ण होण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत !