रशिया-युक्रेन युद्ध तातडीने थांबवा ! – आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश

रशियाकडून होत असलेल्या बळाच्या वापरामुळे न्यायालयाकडून चिंता व्यक्त !

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की (उजवीकडे)

द हेग (नेदरलँड्स) – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध तातडीने थांबवावे, असा आदेश येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’ने) दिला. आता रशिया न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करतो कि नाही, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. युक्रेनमध्ये रशिया बळाचा वापर करत असल्यामुळे न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

 (सौजन्य : CNBC-TV18)

१. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की म्हणाले,  ‘‘आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. रशियाने त्वरित त्याचे पालन केले पाहिजे. न्यायालयाचा आदेश न पाळल्यास रशिया आणखी एकटा पडेल.’’

२. जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर न्यायाधीश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात; पण तेथेही रशियाला विशेषाधिकार असल्याने त्याच्यावर कारवाई करणे अशक्य आहे.

३. याआधी युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधिशांना रशियाला तात्काळ सैनिकी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचे आवाहन केले होते.