नेपाळी गुरखा रशियातील ‘वॅगनर गटा’च्‍या सैन्‍यदलात ?

भारतातील ‘फर्स्‍टपोस्‍ट’च्‍या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गुरखा योद्धे रशियामधील ‘वॅगनर गटा’मध्‍ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्‍याचे समोर आले आहे. ‘नेपाळी गुरखा रशियाच्‍या खासगी सैन्‍यदलामध्‍ये भरती झाल्‍याने भारतावर परिणाम होणार का ?’, याविषयीची माहिती या लेखात पाहूया.

वर्ष २०१४ मध्ये रशियाने नियंत्रणात घेतलेल्या युक्रेनच्या गावावर युक्रेनकडून  नियंत्रण मिळवण्यास प्रारंभ !

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा युक्रेनवर आक्रमण केले, त्यानंतर युक्रेन वर्ष २०१४ मध्ये रशियाशी झालेल्या युद्धाच्या वेळी रशियाने नियंत्रणात मिळवलेली युक्रेनी क्षेत्रे प्रथमच परत मिळवू लागला आहे, असे म्हटले जात आहे.

आतंकवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावे लागेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेत प्रतिपादन !

जागतिक स्तरावर भारताने महत्त्वाची भूमिका बजावण्याची वेळ आली आहे ! – पंतप्रधान मोदी

भारतात सहस्रो वर्षांपासून सर्व धर्म आणि श्रद्धा यांना एकत्र रहाण्याचे अन् प्रगती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तुम्हाला भारतात प्रत्येक श्रद्धा आणि धर्म यांचे लोक शांततेने जगतांना आढळतील

रशियाने मित्रराष्ट्र बेलारूसमध्ये पोचवली परमाणु शस्त्रास्त्रे ! – बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष

रशियाने परमाणु शस्त्रास्त्रे बेलारूसमध्ये पोचवली आहेत. ही माहिती बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्सांद्र लुकाशेंको यांनी स्वत: रशियाच्या एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत दिली. त्यांनी सांगितले की, आम्हाला रशियाकडून क्षेपणास्त्रे आणि बाँब मिळाले आहेत.

युक्रेनमध्ये युद्धातील आक्रमणात फोडण्यात आलेल्या धरणामुळे निर्माण झाली पूरस्थिती !

३० हून अधिक गावे आणि शहरे येथे पूरस्थिती !
रशियाच्या सैन्याच्या विरोधात पुरलेले भूसुरूंगामुळे बचाव कार्यात अडथळा !

युद्धात युक्रेनचे सर्वांत मोठे धरण उद्ध्वस्त !

दोन्ही देशांनी एकमेकांवर धरण उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. धरण उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यातील पाणी युद्धभूमीपर्यंत पोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी करण्यात येत आहेत.

जर्मनीत यापुढे रशियाचे दोन दूतावास चालू ठेवण्यास अनुमती !

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध याआधीच लादले आहेत.

पाश्‍चिमात्य देश अजूनही रशियाकडून तेल आणि वायू विकत घेत आहेत ! – रशियाचा दावा

मार्च २०२३ मध्ये ‘ब्लूमबर्ग’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार काही युरोपीय देश रशियाचा नैसर्गिक द्रवरूप वायू (लिक्विफाईड नॅच्युरल गॅस) नियमितपणे विकत घेत आहेत. यामध्ये स्पेन आघाडीवर आहे.

रशियाकडून युक्रेनवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे ड्रोन आक्रमण ! – युक्रेनचा दावा

युक्रेनने आरोप केला की, इराणने रशियाला ड्रोन दिले असून रशिया युक्रेनच्या विरोधात त्यांचा वापर करते. इराणने मात्र हा आरोप फेटाळला आहे. दुसरीकडे रशियानेही ‘आम्ही वापरत असलेली सर्व शस्त्रास्त्रे रशियामध्येच बनवली जातात’, असे म्हटले आहे.