८० गावांना पुराचा धोका
कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आता रशियाने युक्रेनमधील सर्वांत मोठे काखोव्का धरण उद्ध्वस्त केले आहे; मात्र या दोन्ही देशांनी एकमेकांवर धरण उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. धरण उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यातील पाणी युद्धभूमीपर्यंत पोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी करण्यात येत आहेत.
८० गावांना पुराचा धोका आहे. युक्रेनमधील हे धरण वर्ष १९५६ मध्ये सोव्हिएत युनियनच्या राजवटीत बांधण्यात आले होते. निपर नदीवर बांधलेले हे धरण ३० मीटर उंच असून ३.२ किमी परिसरात पसरले आहे. काखोव्का धरणातून क्रिमिया आणि झापोरोझ्ये अणु प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जातो.