|
कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात युक्रेनमधील काखोव्का धरण फोडण्यात आल्याने येथे पूर आला आहे. खेरसन प्रांतातील ३० हून अधिक गावे आणि शहरे येथे पूर आला आहे. यांपैकी २० ठिकाणे युक्रेनच्या आणि १० रशियाच्या सैन्याच्या नियंत्रणात आहेत. २ सहस्र घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. या पुरामुळे ४० सहस्र लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. धरणावरील आक्रमणावरून रशिया आणि युक्रेन एकमेकांवर धरण फोडल्याचा आरोप करत आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवणार्या बचाव पथकावर रशियाने आक्रमण केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.
यूक्रेन में बांध टूटने से डूबे 2000 घर: 30 कस्बे बाढ़ की चपेट में; जेलेंस्की का दावा- पानी में तैर रही डेड बॉडीज#Ukraine #Russia https://t.co/M5RgmzIMvH pic.twitter.com/Q3sWEfQW8D
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 8, 2023
पुराच्या बचाव कार्याच्या वेळी रशियावर आक्रमण करण्यासाठी पेरलेले भूसुरुंग आता बचाव कार्यात अडथळा ठरत आहेत. परिसरात पाणी साचल्याने ते शोधणे कठीण झाले आहे. भूसुरुंग पाण्याच्या प्रवाहामुळे तरंगू लागले आहेत. जर ते एखाद्या वस्तूवर आदळले, तर त्यांचा स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.