‘जी-२०’ देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सप्टेंबरमध्ये भारत दौर्‍यावर

या दौर्‍यामध्ये जो बायडेन अन्य देशांच्या प्रमुखांशी युक्रेन-रशिया युद्ध आणि अन्य जागतिक आव्हाने या विषयांंवर चर्चा करणार आहेत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

युक्रेनकडून मॉस्कोवर ड्रोनद्वारे आक्रमणाचा प्रयत्न ! – रशिया

हा प्रयत्न रशियाने हाणून पाडला. युक्रेनचे तिन्ही ड्रोन नष्ट करण्यात आले, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

‘नाटो’ देशांनी बेलारूसवर आक्रमण केले, तर अणूबाँबने प्रत्युत्तर देऊ !  

आम्ही अणूबाँब कुणाला घाबरवण्यासाठी आणलेले नाहीत. आमच्यावर आक्रमण झाले, तर आम्ही शांत बसणार नाही आणि वाटही पहाणार नाही. आमच्या संरक्षणासाठी आमच्या शस्त्रांचा पुरेपूर वापर करू.

पाक रशियाकडून कच्चे तेल आयात करणे बंद करणार !

पाकिस्तानची निर्मिती द्वेषावर आधारित आहे. या द्वेषामुळेच या देशाचे अस्तित्व एक दिवशी संपवणार आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

रशियाने युक्रेनवरील धान्य निर्यातीच्या प्रमुख मार्गावर केले आक्रमण !

रशियाने युक्रेनमधील डॅन्यूब नदीवर असलेल्या ‘इज्माइल’ नावाच्या बंदरावर आक्रमण केले. येथील धान्याचे एक कोठार नष्ट करण्यात आल्याने धान्याची जागतिक स्तरावरील किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

युक्रेनकडून रशियावर ड्रोनद्वारे आक्रमण !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, तसेच रशियावर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी भारतावरही दबाव आणला. आता युक्रेनकडून रशियावर आक्रमण केले जात असतांना मूग गिळून गप्प बसणार्‍या पाश्‍चात्त्य देशांना भारताने आरसा दाखवला पाहिजे !

मॉस्कोवर ड्रोनद्वारे आक्रमण

शहरात ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले असून रशियाने या आक्रमणासाठी युक्रेनला उत्तरदायी ठरवले आहे. या आक्रमणामुळे २ इमारतींची हानी झाली आहे, तसेच १ जण घायाळ झाला आहे. शहराच्या महापौरांनीही आक्रमण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मॉस्को येथे ड्रोनद्वारे होणारे युक्रेनचे आक्रमण उधळल्याचा रशियाचा दावा !

मॉस्को शहराचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी दावा केला, ‘येथे रात्री ड्रोनद्वारे २ इमारतींवर आक्रमण करण्यात आले. यात जीवित हानी झालेली नाही.

रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत !

रशियाच्या सैन्यातील बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. युद्धासाठी पुतिन यांच्या अवास्तव मागण्या, सैन्यातील अडथळे आणि रशियन संरक्षण मंत्रालयाची अकार्यक्षमता, याला कारणीभूत आहे.

रशिया भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे विकत घेण्याची शक्यता !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला १ वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांच्या शस्त्रांमध्ये घट झाली आहे.