बीड येथे एस्.टी. बस आणि ट्रक यांची धडक होऊन भीषण अपघात !

अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक यांचा चुराडा झाला असून बचावकार्यासाठी घटनास्थळी क्रेन बोलवण्यात आली होती. घायाळ झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

भारतातील रस्ते अपघातांचे भीषण वास्तव !

‘भारतात मागील १० वर्षांत रस्ते अपघातांमुळे १३ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० लाखांहून अधिक जण घायाळ झाले आहेत’, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाईट हवामानामुळेच बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याचा निष्कर्ष

देशाचे पहिले तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कसे कोसळले, याविषयीची चौकशी पूर्ण झाली आहे.

भिवानी (हरियाणा) येथे भूस्खलनात दोघांचा मृत्यू

भिवानी जिल्ह्यात भूस्खलनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाखाली १० वाहने दबली गेली असून यात जवळपास २० लोक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमरावती येथे विजेच्या झटक्याने ४ कर्मचार्‍यांचा मृत्यू !

अमरावती येथील कठोरा रस्त्यावरील पी.आर्. पोटे पाटील एज्युकेशन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर २९ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोखंडी शिळीमध्ये विद्युत् प्रवाह येऊन महाविद्यालयातील ४ शिपाई कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

पेण-खोपोली मार्गावर आंबेगावजवळ झालेल्‍या भीषण अपघातात दोघांचा मृत्‍यू !

या अपघातात अनंत कृष्‍णा दिवेकर (वय ६७ वर्षे) यांचा जागीच मृत्‍यू झाला, तर त्‍यांचे भाऊ हरिभाऊ कृष्‍णा दिवेकर (वय ६० वर्षे) यांचाही नंतर रुग्‍णालयात मृत्‍यू झाला.

जैसलमेर (राजस्थान) येथे वायूदलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

‘उडत्या शवपेट्या’ अथवा ‘विधवा बनवणारी विमाने’ असा लौकिक असलेली मिग -२१ विमाने आणखी किती वर्षे भारतीय वायूदलामध्ये वापरण्यात येणार आहेत ?

ओसाका (जपान) येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत २७ जण ठार !

इमारतीच्या चौथ्या माळ्यावर असलेल्या मानसोपचार रुग्णालयाला ही आग लागली होती. ‘जापान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’च्या वृत्तानुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून काही घातपात आहे का, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत.

कुन्नूर (तमिळनाडू) येथील हेलिकॉप्टर अपघातात घायाळ झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

त्यांच्यावर बेंगळुरू येथील वायूदलाच्या रुग्णालयात उपचार चालू होते. ते ४५ टक्के भाजले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

देशभरातील महामार्गांवरील अपघातांत गेल्या वर्षी ४७ सहस्र ९८४ लोकांचा मृत्यू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

गडकरी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, वेग, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, भ्रमणभाषचा वापर इत्यादींचा समावेश आहे.