ओसाका (जपान) – येथील एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये २७ लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. ‘जापान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ने दिलेल्या वृत्तानुसार अर्ध्या घंट्यात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून यामागे काही घातपात आहे का, याचे पोलीस प्रशासन अन्वेषण करत आहे.
Osaka building fire: fears 27 people have died in Japan blaze https://t.co/n0g2PSXsls
— Guardian news (@guardiannews) December 17, 2021
इमारतीच्या चौथ्या माळ्यावर असलेल्या मानसोपचार रुग्णालयाला ही आग लागली होती. वर्ष २०१९ मध्ये देशातील क्योटो येथे एका फिल्म स्टुडिओला (चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे ठिकाण) लागलेल्या आगीमध्ये ३६ लोक जळून भस्मसात झाले होते. एका व्यक्तीने ही आग जाणीवपूर्वक लावली होती. दुसर्या विश्वयुद्धानंतर जापानमध्ये झालेला हा सर्वांत मोठा घातपात असल्याचे म्हटले गेले होते.