आमदार प्रवीण पोटे यांच्या महाविद्यालयातील घटना

अमरावती – येथील कठोरा रस्त्यावरील पी.आर्. पोटे पाटील एज्युकेशन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर २९ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोखंडी शिळीमध्ये विद्युत् प्रवाह येऊन महाविद्यालयातील ४ शिपाई कर्मचार्यांचा मृत्यू झाला. अक्षय सावरकर, प्रशांत शेलोरकर, संजय दंडनाईक आणि गोकुळ वाघ, अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मुख्य प्रवेशद्वारासमोरून उच्च दाबाची विद्युत् तारेची वाहिनी गेली आहे. महाविद्यालयाचे हे ४ शिपाई मुख्य प्रवेशद्वाराचे रंग रंगोटी करत असतांना लोखंडी शिळीची विद्युत् तारेला स्पर्श झाल्याने ही घटना घडली. विद्युत् प्रवाह इतका अधिक होता की लोखंडी शिळीचे पाय जागीच वितळले. याप्रकरणी हलगर्जीपणा करणार्यांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा जिल्हा रुग्णालयात येऊन मृत झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबांशी संवाद साधला.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !