ठाणे येथे गाडीच्‍या धडकेत २ पोलीस हवालदार घायाळ !

वेगाने जात असलेल्‍या गाडीची धडक बसून झालेल्‍या अपघातात २ पोलीस हवालदार घायाळ झाले असून त्‍यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे खासगी बसला अपघात : २ ठार, ३० घायाळ 

हळवल येथील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असतात. असे असूनही महामार्गाचे काम करणारे ठेकेदार, आस्थापन आणि प्रशासन यांच्याकडून या समस्येवर ठोस उपाययोजना काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील भीषण अपघातामध्ये ९ जण जागीच ठार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे प्रलंबित काम आणि वाढते अपघात यांमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

युक्रेनमधील हेलिकॉप्‍टरच्‍या अपघातात एका मंत्र्यासह १६ जण ठार !

डेनिस मोनास्‍टिसस्‍की असे मृत्‍यू झालेल्‍या मंत्र्याचे नाव आहे. ‘हेलिकॉप्‍टरचा अपघात नेमका कसा झाला ?’, ‘ते इमारतीला कस धडकले ?’, हे अद्याप समजू शकलेले नाही.

नागपूर येथे मांजाने गळा कापला गेल्‍याने एकाचा मृत्‍यू !

नुसते असे आवाहन करण्‍यापेक्षा प्रशासनाने अशा अपघातांना आळा बसावा, यासाठी नायलॉन चिनी मांजाची विक्री करणार्‍यांना शोधून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे !

संभाजीनगर येथे होलसेल कापड दुकानाला भीषण आग !

महानगरपालिकेच्‍या अग्‍नीशमनदलाच्‍या ७ बंबांनी पाणी फवारून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

नेपाळमध्ये विमान कोसळले : आतापर्यंत ७२ पैकी ६२ जणांचे मृतदेह सापडले !

विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही. येथे साहाय्यता कार्य करणार्‍यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘सेराफ्लेक्स’ आस्थापन आगीच्या भक्ष्यस्थानी

येथील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘सेराफ्लेक्स’ आस्थापनास १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात संपूर्ण आस्थापन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.

सिन्‍नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात १० जण ठार !

सिन्‍नर-शिर्डी महामार्गावर १३ जानेवारीच्‍या पहाटे ५ वाजता पाथरे येथे  मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस आणि शिर्डीकडून सिन्‍नर बाजूकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या भीषण अपघात १० प्रवासी ठार, तर २५-३० प्रवासी घायाळ झाले आहेत.

गोवा : पिळर्ण येथे रंग बनवणार्‍या कारखान्याच्या गोदामाला लागलेली आग १६ घंट्यांनंतर नियंत्रणात

आतापर्यंत आग विझवण्यासाठी ४ टन ‘फोम’ आणि १२ लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. अग्नीशमन दलाचे १०० कर्मचारी घटनास्थळी दिवसरात्र काम करत होते. त्यांना संरक्षण, नौदल आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.