Libya Boat Accident : युरोपमध्ये जाणार्‍या शरणार्थींची नौका समुद्रात बुडाल्याने ६१ जणांचा मृत्यू  

त्रिपोली (लिबीया) – लिबियाच्या समुद्रकिनार्‍यावर प्रवाशांनी भरलेली एक नौका बुडाल्याने ६१ जणांचा मृत्यू झाला. या नौकेत महिला आणि मुले यांच्यासह एकूण ८६ जण होते. हे प्रवासी समुद्रमार्गाने युरोपमध्ये जात होते. मध्य-पूर्व आणि आफ्रिका खंडातील अराजक स्थितीमुळे तेथील अनेक नागरिक युरोपमध्ये शरणार्थी म्हणून जात आहेत. समुद्रमार्गाने जातांना अनेकदा अशा प्रकारचे अपघात झाले आहेत. जूनमध्ये झालेल्या अपघातात ७९ जणांचा बुडून मृत्यू झाला, तर शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.