केंद्राने ध्वजसंहितेत केलेल्या पालटानुसार आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार !

पॉलिस्टरपासून सिद्ध केलेल्या, तसेच यंत्रावर सिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला कोणत्याही वेळी वंदन करता येईल.

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी व्हा ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

पलूस (जिल्हा सांगली) येथे २ मार्चला अभाविपच्या वतीने १ सहस्र फूट भव्य तिरंगा पदयात्रा !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या निमित्ताने अभाविप वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत हे तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे.

‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमीचा विद्यालयामध्ये निवेदन देण्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाविद्यालयामध्ये निवेदन दिले. या वेळी सौ. चोपडा यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याविषयी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

राष्ट्रीय दुखवट्याच्या वेळी फलटण नगरपालिकेसमोरील राष्ट्रध्वज फडकतच होता !

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला होता; मात्र फलटण नगरपालिकेने याची नोंद न घेता पालिकेसमोरील राष्ट्रध्वज नेहमीप्रमाणे फडकत ठेवला होता.

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील जिज्ञासूंसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिन, म्हणजेच २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक जिज्ञासू उपस्थित होते.

‘प्लास्टिकचे राष्ट्रध्वज’ आणि ‘तिरंगा मास्क’ यांची विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुंबईत पोलीस प्रशासनाला निवेदन

तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही.

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे क्रांतिकारकांच्या स्मारकांचे पूजन आणि संपूर्ण ‘वन्देमातरम्’ म्हणून भारतमातेला अभिवादन !

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे संपूर्ण ‘वन्देमातरम्’ म्हणण्यात आले. या वेळी दिलेल्या ‘भारतमाता की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानात उत्तर महाराष्ट्रातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून धुळे येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात आली.

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देहलीच्या राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.