
पलूस (जिल्हा सांगली), १ मार्च (वार्ता.) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पलूसकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २ मार्च या दिवशी भव्य १ सहस्र फुटाची तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे. धोंडीराम नगरी पलूस येथे सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक श्री. ऋषिकेश पोतदार यांनी दिली.
श्री. पोतदार म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या निमित्ताने अभाविप वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने पलूस मध्ये सर्व ग्रामस्थांना समवेत घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे. २ मार्च या दिवशी सकाळी ८ वाजता लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय पलूस येथून पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे.’’
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !