हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

नवी देहली – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिन, म्हणजेच २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथील अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सहज सोप्या भाषेमध्ये राष्ट्रध्वजाविषयीची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सिमरन सचदेवा हिने केले.
‘लायन्स क्लब’च्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन
२५ जानेवारी या दिवशी ‘लायन्स क्लब’च्या वतीने एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ब्रिगेडियर मनिंदर मन उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. मंजुळा कपूर यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अनेक सदस्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे क्लबच्या प्रमुखांनी कौतुक केले.
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना