‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमीचा विद्यालयामध्ये निवेदन देण्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

फरिदाबाद (हरियाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गामध्ये येथील सौ. नीरजा चोपडा उपस्थित असतात. २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याविषयी आपण महाविद्यालयामध्ये निवेदन देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करू शकतो, असे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी अशा प्रकारचे निवेदन वल्लभगड येथील त्यांच्या मुख्याध्यापक पतींना, तसेच त्या शिकवत असलेल्या विद्यालयातील मुख्याध्यापकांनाही  देऊ शकतो, असे सांगितले. त्याप्रमाणे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन्ही ठिकाणी निवेदन दिले. या वेळी सौ. चोपडा यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याविषयी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याशिवाय दोन्ही वेळा निवेदन देतांना त्यांनी छायाचित्र काढण्याची सेवा केली.