नवी देहली – देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देहलीच्या राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर येथे सैन्य संचलन, तसेच विविध नृत्य आणि देखाव्यांचे संचलन करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
On Republic Day, we recall the great women and men who worked towards the making of our Constitution. We also reiterate our commitment to fulfil their dreams for our nation.
Here are glimpses from the Republic Day celebrations. pic.twitter.com/xH1JajaY8d
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2022
यासह देशातील राज्यांच्या राजधानीत, तसेच जिल्हा, तालुका स्तरांवरही ध्वजारोहण करण्यात आले. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाख येथील सीमेवर तैनात असणार्या सैनिकांनी १५ ते १७ सहस्र ५०० फूट उंचीवर सैनिकी तळांच्या ठिकाणी पूर्ण उत्साहात तिरंगा फडकावला. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी उणे ४० सेल्सिअस तापमानात राष्ट्रध्वज फडकावला.