सोलापूर येथील तलाव आणि मैदानाच्या नावांमध्ये सुधारणा करा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापौर आणि पालिका आयुक्त यांना निवेदन

नंदुरबार शहरातील उघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची हिंदु सेवा साहाय्य समितीची मागणी

का पिसाळलेल्या कुत्र्याने वीर सावरकर नगर येथील पाच वर्षीय कु. हिताक्षी मुकेश माळी हिचा चावा घेतल्याने तिचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. कामात कुचराई करणार्‍या संबंधित स्वच्छता ठेकेदाराचा ठेका रहित करावा, मांस विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून उघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी…

कणकवली शहरात अज्ञाताने लावलेल्या आगीत २ दुचाकी जळल्या, तर एका दुचाकीची अंशतः हानी

शहरातील नागवे रोड येथील संजय ढेकणे यांच्या घराजवळ रस्त्यालगत उभ्या करण्यात आलेल्या ३ दुचाकी जाळण्याचा प्रयत्न ९ डिसेंबरला पहाटे अज्ञाताने केला. यामध्ये २ दुचाकी जळून खाक झाल्या, तर १ दुचाकी वाचवण्यात स्थानिकांना यश आले.

अकोला येथे भजन आणि कीर्तन यांसाठी वारकरी संघटनांचे आमरण उपोषण !

वारकर्‍यांकडून उपोषणस्थळी सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी संत गजानन महाराज यांच्या मूर्तीसमोर ‘सद्बुद्धी यज्ञ’ करण्यात आला. 

कोल्हापूर जिल्ह्यात ४०० शाळा चालू, तर ६५४ शाळा अद्यापही बंदच !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून निघण्यासाठी शाळा लवकर चालू होणे अपेक्षित असतांना प्रशासनाने अशा प्रकारे ढिलाई करणे लज्जास्पद आहे.

सुरूंग स्फोटांमुळे हानी झालेल्यांना हानीभरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करू ! – निगुडे ग्रामस्थांची चेतावणी

खनिजांच्या अतीउत्खननामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संबंधित उपाययोजना प्रशासनाने स्वतःहून करायला हव्या होत्या ! प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

उसगाव येथील शिक्षिका कोरोनाबाधित

ज्येष्ठ शिक्षिका कोरोनाबाधित झाल्याने उसगाव, फोंडा येथील विद्यालयाचे इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग एक आठवड्यासाठी रहित करण्यात आले आहेत.

शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठिंबा; मात्र बंदमध्ये व्यापारी सहभागी नाही ! – अतुल शहा, व्यापारी महासंघ

श्री. अतुल शहा यांनी पुढे म्हटले आहे की, आजपर्यंत कुठल्याच सरकारने शेतकरी हिताचा विचार केलेला दिसून येत नाही. आज या देशाचा अन्नदाता प्रचंड अडचणीत आहे आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना समृद्ध बनवणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

१२ लाख रुपयांची अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत.