कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याने नगर येथील १९ सहस्र नागरिकांवर कारवाई !

अशा नागरिकांमुळेच कोरोना आटोक्यात येत नाही, असे कोणाला वाटल्यास चूक ते काय !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नगर,२० मे – मास्क न वापरणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, दळणवळण बंदीच्या काळात दुकाने उघडी ठेवणे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे अशा नियम मोडणार्‍या १९ सहस्र ४४९ नागरिकांवर कारवाई करत जिल्हा पोलीस दलाने एका मासात ८१ लक्ष ७५ सहस्र ३०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाकडून लागू केलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रशासनाने नियम पाळण्याचे धडे नागरिकांना दिले नाहीत त्याचाच हा परिणाम नाही का ? – संपादक)